Monday, February 10, 2025
Muktai Varta
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
No Result
View All Result
Muktai Varta
No Result
View All Result

Jalgaon News: जळगावात बनावट नोटांचे रॅकेट, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या अवळल्या

Admin by Admin
January 20, 2023
in मनोरंजन
0
Jalgaon News: जळगावात बनावट नोटांचे रॅकेट, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या अवळल्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon Distric) साकेगाव (ता. भुसावळ) येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठीकाणी सुरू असलेले बनावट नोटांच्या (Duplicate Currency) रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. खर्‍या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारी टोळी या ठकाणी कार्यरत होती. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. बनावट नोटाच्या या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

याबाबत माहती अशी की, जळगाव जिल्ह्यातील साकेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचे रॅकेट सुरू होतो. बनावट नोटांच रॅकेट चालवणारी ही टोळी खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलवून देत होती. त्यानुसार साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट सक्रीय असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले. या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात शन्नो या महिलेला अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या.

चौकशीसाठी अनेकांना घेतले ताब्यात

दरम्यान, एका महिलेला अतिशय गोपनीय पध्दतीत ताब्यात घेण्यात आले. तिने दिलेल्या जबाबावरून पहूर येथील हनीफ पटेल ( वय ५५) याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी साकेगावातील अजून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बनावट नोटांच्या रॅकेटचे पायमुळे कुठं पर्यंत आहे, याचा शोध घेण्याच्या दृष्टने पोलीस तपास करीत आहे.

Like this:

Like Loading...
Tags: crime newsDuplicate CurrencyJalgaon DistricJalgaon News
Previous Post

Laal Rang 2 : लाल रंग 2 चे पोस्टर रिलीज, लूक शेअर करत रणदीप म्हणाला…

Next Post

Shanivar Vrat Katha: शनिवारी करा ‘या’ कथेचे वाचन, दूर होईल शनिदेवाचा प्रकोप

Admin

Admin

Next Post
Shanivar Vrat Katha: शनिवारी करा ‘या’ कथेचे वाचन, दूर होईल शनिदेवाचा प्रकोप

Shanivar Vrat Katha: शनिवारी करा 'या' कथेचे वाचन, दूर होईल शनिदेवाचा प्रकोप

संपादक : संतोष सुपडू मराठे

वार्ता संग्रह

February 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • मुक्ताई वार्ता
  • जळगाव
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकीय
  • खेळ
  • व्हायरल
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

%d